राष्ट्रहितासाठी सामाजिक भान आणि नेतृत्वगुण जोपासा : डॉ. राजीव प्रधान

जळगाव, ता. ११ : मी माझे काम चोख करेन. इतरांच्या कामाशी मला काही देणंघेणं नाही,’ अशी वृत्ती असून चालत नाही. अन्य सहकाऱ्यांबरोबर एकत्रितपणे काम करण्याची कला अवगत करून घ्यायला हवी. टीममध्ये राहून आपले वेगळेपण टिकविणे हेही एक कौशल्य आहे. सकारात्मक दृष्टी गरजेची आहे. सतत दोषदिग्दर्शन करणे योग्य नाही तसेच नेतृत्वाचे विविध अष्टपैलू गुण आत्मसात करा असे प्रतिपादन सोलापूर शहरातील सुपरिचित प्राध्यापक व तेथील रोटरी क्लबचे माजी डीस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रा. डॉ. राजीव प्रधान यांनी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीबीए प्रथम वर्षाच्या इंडक्शन कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे आयोजित सोशल कॉन्सिअसनेस अॅन्ड लीडरशिप क्वालिटीया विषयावर आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इंस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीचे प्रकाश पटेल हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद की, या कार्यक्रमाचा उद्देश नवीन विद्यार्थ्यांना नवीन वातावरणात जुळवून घेण्यास मदत करणे, नविन प्रवेशीत विद्यार्थ्यांमध्ये संस्थेची आणि महाविद्यालयाची नैतिकता आणि संस्कृती बिंबवणे, त्यांना इतर विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्यांसोबत बंध निर्माण करण्यास मदत करणे आणि त्यांना आपल्या जीवनाच्या उद्देशाची जाणीव करून देणे हा आहे. त्याच बरोबर महाविद्यालयामधील उपलब्ध सर्व सोयीसुविधा जसे ग्रंथालय, महाविद्यालयात उपलब्ध असलेले सर्व अभ्यासक्रम, विद्यार्थी कल्याणाच्या योजना, धोरणे त्याचप्रमाणे खेळ, कला, साहित्य, संस्कृती, मुल्यशिक्षण याविषयीची सखोल माहीती दिली. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 ची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची जबाबदारी असून स्वायत्त रायसोनी महाविद्यालयात वेल डिग्री प्रोग्राम, अॅकड्मिक बॅकोक क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची रायसोनी महाविध्यालयात आधीपासूनच सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 च्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु आहे. तसेच त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची व हॉबी क्लबची माहिती देत विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असल्याचे सांगत नविन प्रवेशीत विद्यार्थ्यांना सर्व प्राध्यापकांचा परिचय देखील त्यांनी यावेळी करुन दिला. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. राजीव प्रधान यांनी आपल्या मार्गदर्शनात नेतृत्वाचे विविध अष्टपैलू गुण नमूद केले त्यातील पहिला

नि:स्वार्थीपणा : जो स्वत:च्या स्वार्थापलीकडे पाहू शकतो त्याच्यातच नेतृत्वाची क्षमता जास्त असते. आणि हा स्वार्थ व्यक्तीच्या तसेच समाजाच्या हिताचाही कसा असेल हे ज्याला कळतं तोच चांगला नेता होऊ शकतो. आणि कुटुंबाच्या हितासाठी स्वत:चा स्वार्थ, समाजाच्या हितासाठी कुटुंबाचा स्वार्थ बाजूला ठेवायची ज्याची तयारी असते तोच आदर्श नेता असतो.

दूरदृष्टीपणा : नेत्याला आपल्या समूहाच्या भल्यासाठी भविष्यात येणार्‍या गोष्टींचा विशेषत: संकटांचा अंदाज लावण्याची क्षमता असावी लागते. त्यानुसार त्या संकटाचा सामना करण्यासाठी तो आवश्यक ती उपाययोजनाही करून ठेवतो. दूरदृष्टीचा अभाव असलेली माणसं स्वत:सोबत आपल्या अनुयायांनाही अडचणीत आणतात. ऐकण्याची

इच्छा : चांगला नेता निव्वळ व्याख्यानं, आदेश देत नाही. तो आधी चांगला श्रोता असतो. समोरच्याचं म्हणणं ऐकण्याची त्याची इच्छा असते आणि तयारीही. तो सारं काही सहानुभूतीनं आणि समजूतीनं ऐकतो. ऐकण्याच्या बाबतीत तो लहानमोठा असा भेदभाव करत नाही.

जबाबदारपणा : आपल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी घ्यायला चांगला नेता तयार असतो. विशेषत: अपयशाची जबाबदारी तो स्वत:वरच घेतो. त्याचा दोष तो कोणा इतरावर लादत नाही. आणि यशाच्या वेळी तो कधी आपल्या लोकांना विसरत नाही.

प्रेरकवृत्ती : चांगला नेता स्वत:लाही कायम प्रोत्साहित करतो आणि आपल्या लोकांनाही चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देतो. अपयशात त्यांच्यातला आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी तो धडपडतो. त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी कार्यरत राहतो. न्यायीपणा : निरपेक्ष, नि:स्वार्थ न्यायवृत्ती ही चांगल्या नेत्याची महत्त्वाची खूण आहे. न्याय करताना तो संबंधिताशी असलेले आपले नाते लक्षात घेत नाही तर केवळ सत्याच्या आधारेच न्याय करतो. हाच न्याय तो स्वत:लाही लावतो. त्याच्या दृष्टीत सारे समान असतात.

उदारता : उत्तम नेता हा उदार असतो. तो दयाळू असतो. पण त्याचे हे गुण त्याचा कमकुवतपणा नसतात. आपल्या सहकार्‍यांप्रती त्याची ही उदारता दयाभावनेतून येत नाही तर प्रेमातून येते. त्यांनी अधिक चांगलं वागावं या भावनेतून येते.

कणखरपणा : अडचणीतच नव्हे तर आनंदाच्या काळातही चांगला नेता कधीही चुकीचे निर्णय घेत नाहीत. कोणत्याही व कोणाच्याही दबावाखाली तो काम करत नाही. त्याचे निर्णय हे पूर्वग्रहदूषित नसतात आणि स्वार्थाने बरबटलेलेही नसतात. तो कायम कणखर असतो आणि त्याची ही कणखरता त्याच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. चांगल्या नेतृत्वाला आवश्यक ही गुणांची यादी आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनातच नाही तर सार्वजनिक जीवनातही जो यांच्या आधारे काम करेल त्याला नेतृत्वाच्या संधी नक्कीच उपलब्ध होतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी रोटरी क्लबचे मनीष पाटील, नीरज अग्रवाल निलेश जैन, निखील चौधरी, अशोक जैन व आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रा. श्रिया कोगटा यांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश