व्यावसायिकांनी राजॠषि, वृद्धसंयोग व मित्रसंबंध हि तीन सूत्रे नेहमी लक्षात ठेवावी : मॅनेजमेंट गुरु डॉ. राधाकृष्णन पिल्लई

जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे चाणक्य-फॉर कॉर्पोरेट लीडरशिपवर व्याख्यान शहरातील नागरिकांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती

जळगाव, ता. १ :  प्रत्येक मूल जन्माला येताना उद्यमशीलता आणि नेतृत्व हे गुण घेऊन येते. भारतीय तरुणांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. गरज आहे ती, त्यांच्यातील या गुणांना चालना देऊन उद्यमशील आणि नेतृत्वक्षम बनविण्याची. त्यामुळे तरुणांनीही आपल्यातील क्षमता ओळखून उद्यमशीलतेला प्राधान्य देत व्यवसाय उभारावा,’ असे मत जी. एच. रायसोनी मेमोरियल टॉकमार्फत स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चाणक्य-फॉर कॉर्पोरेट लीडरशिपया विषयावरील व्याख्यानात चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लीडरशीपचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध लेखक तसेच मॅनेजमेंट गुरु डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांनी व्यक्त केलं. ता. ३० शुक्रवार रोजी शहरातील खानदेश सेंट्रल मॉलमधील आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. अविनाशजी रायसोनी, श्री. महेन्द्रजी रायसोनी, श्री. रमेश जाजू, सौ. जोत्स्ना रायसोनी, रायसोनी इस्टीट्युटचे कार्यकारी संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, सौ. राजुल रायसोनी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. त्यात त्यांनी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाची शैक्षणिक व उपक्रमाची माहिती देत जळगाव शहरातील उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी, आम्ही भारतातील सर्वात लोकप्रिय लेखक - डॉ. राधाकृष्ण पिल्लई यांना आमंत्रित केले असून कौटिल्याच्या अर्थशास्त्रावर ते नक्कीच आपल्याला विस्तृत व संशोधीत मार्गदर्शन करतील असे नमूद केले. यानंतर रायसोनी इस्टीट्युचे विश्वस्त श्री. अविनाशजी रायसोनी यांनी आपल्या वडिलांना आदरांजली वाहत नमूद केले कि, समाज आणि देशाच्या उभारणीत आपण सदैव योगदान द्यावे, अशी माझ्या वडिलाची धारणा होती. त्यांनी आम्हा भावडांना समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण नेहमीच दिली,’ अशा शब्दांत त्यांनी आपले वडील स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांनी लीडरची तीन सूत्रे सांगितली

१) राजॠषि (राजर्षि): लीडर हा राजा आणि ऋषी यांचा संयोग असला पाहिजे म्हणजेच त्यांच्याकडे ऋषीसारखे शहाणपण - दूरदृष्टी असणे आवश्यक असून राजासारखे सामर्थ्य आणि निर्णय क्षमता देखील असणे आवश्यक आहे.

२) वृद्धसंयोग : लीडरने स्वतःला ज्ञानी आणि अनुभवी लोकांनी वेढले पाहिजे तसेच सदैव तो सल्ला ऐकण्यास आणि इतरांकडून शिकण्यास नेहमी तत्पर असला पाहिजे.

३) मित्रसंबंध : लीडरने त्यांच्या सहकाऱ्यांशी आणि नातेवाईकांशी नेहमी मजबूत संबंध निर्माण केले पाहिजेत तसेच इतरांवर विश्वास ठेवण्यास आणि विसंबून राहण्यास सक्षम असले पाहिजेत आणि इतरांना यशस्वी होण्यास मदत करण्यास ते नेहमी तत्पर असले पाहिजे.

यानंतर ते पुढे म्हणाले कि,  चाणक्य यांच्या मते व्यवसायात चांगले नेटवर्किंग असणे गरजेचे आहे. जर तुमचे नेटवर्किंग मजबूत असेल तर तुम्ही व्यवसाय वाढवू शकता. याशिवाय व्यवसाय करताना बौद्धिक क्षमता चांगली असणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला चाणक्य देतात. तसेच व्यवसाय करताना नवनवीन गोष्टींचे ज्ञान मिळवायला हवे. यामुळे भविष्यात व्यवसाय करताना अडथळा निर्माण होणार नाही आणि व्यवसाय आणखी वृद्धिंगत होण्यास मदत होइल. तसेच कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्याचा विचार करा. विशेषतः व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य तो विचार करा. एकदा सुरुवात केल्यावर मध्येच थांबू नका. तुमचे काम पूर्ण निष्ठेने करा. बरेच लोक विचारांची देवाणघेवाण करण्यात अयशस्वी होतात. व्यवसाय करताना धीर अधिक महत्त्वाचा असतो. आचार्य चाणक्य म्हणतात की, व्यवसाय हा रोपटासारखा असतो. त्याचे झाडात रुपातंर व्हायला वेळ लागतोच.व्यवसाय सुरू करता तेव्हा तुमच्या कामाची माहिती इतर कोणाला देऊ नका. तुमची योजना कोणाशीही शेअर करू नका. कोणतेही काम करताना मनोबल खच्ची करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. जर तुम्हाला कोणी सल्ला देत असेल की तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही, तर त्यांच्या बोलण्याने विचलित होऊ नका. अशा लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय सुरू केल्यानंतर, पूर्ण मेहनत घेऊन आपले काम करा. यश नक्कीच मिळेल असे त्यांनी यावेळी नमूद केले. प्रा. राहुल त्रिवेदी व प्रा. अंजली बियाणी यांनी अभ्यासपूर्ण निवेदनाने कार्यक्रमाची धुरा पेलली तर रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांची ही संकल्पना होती.


Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश