Posts

Showing posts from June, 2023

उद्या सायंकाळी जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे “चाणक्य-फॉर कॉर्पोरेट लीडरशिप”वर व्याख्यान

Image
प्रसिद्ध व्याख्याते डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे करणार मार्गदर्शन ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे नागरिकांना उपस्थितीचे आवाहन जळगाव , ता. २९ : येथील   जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालय व  जी. एच. रायसोनी मेमोरियल टॉकमार्फत स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांच्या जयंतीनिमित्त उद्या ता. ३० शुक्रवार रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय व्यवस्थापन विचारवंत डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे उपस्थितांशी “ चाणक्य-फॉर कॉर्पोरेट लीडरशिप ” या विषयावर संवाद साधणार असून, शहरातील खानदेश सेंट्रल मॉल मधील आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये सायंकाळी ठीक ५.३० वाजता या व्याख्यानाला प्रारंभ होईल. डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांची लेखक , संघटक आणि कॉर्पोरेट ट्रेनर अशीही ओळख असून , आत्मदर्शन आणि चाणक्य अन्विकी ” हे त्यांचे स्वलिखित पुस्तके वाचकप्रिय आहे. त्याबरोबरच त्यांच्या पुस्तकांनाही मोठी मागणी असून , नुकतेच त्यांचे ‘' द कॉरपोरेट चाणक्य '’ हे पुस्तक मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषेत प्रकाशित झाले आहे. रायसोनी इस्टीट्युटतर्फे वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम ...

‘नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ : ज्ञानसंपन्न भारत घडवण्याची क्षमता असणारा शैक्षणिक जाहीरनामा ! : डॉ. चंद्रकांत साळुंखे

Image
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या वतीने “नवीन शैक्षणिक धोरणा”वर शहरातील विविध स्कूलमधील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी कार्यशाळा ; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक जळगाव, ता. २५ : नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाच्या घटकांकडे बघितल्यास भविष्यातील बदल ठळकपणे अधोरेखित होत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थीकेंद्री शिक्षण पद्धती अमलात येणार असून सर्जनशीलतेला अधिक चालना मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करून नवीन शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल करण्यात आले आहे. भविष्यातील सर्वच क्षेत्रांसाठी हे शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांना व शिक्षण क्षेत्रासाठी नक्की दिशादर्शक ठरेल , असा संवाद शिक्षण अभ्यासक व डायटचे अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी साधला. “ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० - शिक्षकांची भूमिका व आव्हाने ” या विषयावर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात इंग्रजी व मराठी माध्यमातील शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे विश्वस्त व प्रतिनिधी यांच्यासाठी विशेष...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Image
१५ ते २१ जूनच्या दरम्यान योग सप्ताहाचे आयोजन  ;  विध्यार्थ्यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग जळगाव ,  ता. २१ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात बुधवार ता. २१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात योग सप्ताहाचे उत्साहात समारोप करण्यात आला. ता. १५ ते २१ जून दरम्यान महाविद्यालयात योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व कर्मचारी व विध्यार्थ्यांमध्ये सकाळपासूनच नवचैतन्य निर्माण झाल्याने , महाविद्यालयाचा परिसर योगमय झाला होता. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या की , “ योगा  म्हणजे मनुष्याच्या शारीरिक ,  मानसिक व आध्यात्मीक विकासाची गुरुकिल्ली आहे ,  सर्वांनी नियमित योगसाधना करत या प्राचीन शास्त्राचे अगणीत फायदे शोधले पाहीजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगशास्त्राने अविभाज्य स्थान मिळवल्यावरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल असे सांगतानाच ,  योगसाधणेचे महत्व व व...

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात बारावीच्या विध्यार्थ्यांना मोफत “करिअर निवड” मार्गदर्शन

Image
बारावीच्या मुलांनो संधी सोडू नका..! ; विध्यार्थी व पालक यांना उपस्थितीचे आवाहन जळगाव , ता. १५ : बारावी बोर्डाच्या परीक्षेनंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात करिअरचे टेन्शन असते. एक काळ असा होता की बारावीनंतर विद्यार्थ्यांसमोर फारसे पर्याय उपलब्ध नसायचे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी करियर निवडणे सर्वात कठीण होते. आपण कोणता विषय किंवा अभ्यासक्रम निवडावा जो आपले भविष्य घडवण्यास मदत करेल. या विचारांने विद्यार्थी तणावात असायचे. पण , आज करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. विध्यार्थी त्यांच्या आवडीनिवडीनुसार करिअर निवडू शकतात. याअनुषंगाने विविध क्षेत्रातील करिअरच्या संधीबद्दल तज्ञ मार्गदर्शकांकडून तंत्रशुद्ध विनामूल्य मार्गदर्शन व समुपदेशन येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात करण्यात येणार आहे. ता. १९ सोमवार रोजी सकाळी ठीक ११ ते १ वाजेच्या दरम्यान या कार्यशाळेचे जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी खास आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यशाळेचे उद्धाघाटन रायसोनी इस्टीट्...

जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे एमएचटी-सीईटी परीक्षेत घवघवीत यश!

Image
अभूतपूर्व कामगिरी ; संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व प्राचार्या सोनल तिवारी यासह सर्व स्तरातून विध्यार्थ्याचे कौतुक जळगाव , ता. १४ : अभियांत्रिकी व मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या ` एमएचटी- सीईटी ` परीक्षेमध्ये येथील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यामध्ये तेजस विजय बाविस्कर हा विद्यार्थी पीसीएम विभागात ९४.३८ पर्सेंटाईल मिळवून महाविद्यालयातून प्रथम आला असून दर्शन धनराज चव्हाण (९२.९१) , चेतन बिपीन देलीवाला (८३.०४) , वैभव वासुदेव नेहेते (८०.०७) पर्सेंटाईल गुणांसह यशस्वी झाले. तर महाविद्यालयाचे एकूण ५३ विद्यार्थी ७५ पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण मिळवणारे आहेत. या यशाबद्दल जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या कि , '' विद्यार्थी व पालक यांचा प्रचंड विश्वास हा महाविद्यालयाला नेहमीच बळ देण्याचे काम करत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे एमएचटी-सीईटी , जेईई , मेन / अॅडव्हान्स्ड , नीट मेडिकल या सर्वच परीक्षांमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट निकाल लागला...

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात “क्लाउड कॉम्प्युटिंग” या विषयावर कार्यशाळा

Image
विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती ; प्रशिक्षित तज्ञ कुशल मिश्रा व शिवप्रसाद पटेल यांचे सखोल मार्गदर्शन   जळगाव , ता. १३ :   संगणकावरची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी क्लाउड कॉम्प्युटिंग हा एक योग्य पर्याय आहे. हॅकिंग तसेच संगणकात बिघाड झाल्यास डाटा रिकव्हरीची शाश्वती असते. माहिती जतन करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंग असल्याने भविष्यात याचा वापर वाढणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी या पर्यायाचा वापर करणे शक्य असल्याचे मत क्लाउड कॉम्प्युटिंग ट्रेनर कुशल मिश्रा व शिवप्रसाद पटेल यांनी येथे केले. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात बॅचलर ऑफ कंप्यूटर एप्लीकेशन विभाग व मेक इंटर्न अॅण्ड ई-सेल आयआयटी खरगपूरतर्फे "क्लाउड कॉम्प्युटिंग ” या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद‌्घाटन रायसोनी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या हस्ते झाले तर कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी व समन्वयक म्हणून बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे , प्रा. रफिक शेख...

“टॉडलर टेल्स” मध्ये रंगला चिमुकल्यांसाठी 'पपेट शो'

Image
पपेट शोच्या माध्यमाने सादर होणाऱ्या गोष्टीमध्ये रमले लहानगे ; स्कूलचा उत्स्फूर्त उपक्रम  जळगाव, ता. १२ : सावखेडा‎ येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचलित टॉडलर टेल्समधील नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पपेट शो’चे सादरीकरण करण्यात आले. “टॉडलर टेल्स”च्या मुख्याध्यापिका तेजल ओझा व त्यांचे सहकारी शिक्षक वर्ग कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित होते. या संदर्भात माहिती देताना मुख्याध्यापिका तेजल ओझा म्हणाल्या की, विध्यार्थ्यासाठी खूप छान आणि वेगळे कथाकथन सत्र आयोजित करीत असून, विद्यार्थ्यांना कथा अशा प्रकारे जाणवेल की त्यांच्यासमोर कथेतील पात्रे खरी असतील. मुलांच्या ज्ञानात वाढ होण्याबरोबरच या चिमुकल्यांसाठीही याचा खूप फायदा होईल तसेच अभ्यासासोबतच मुलांची कल्पनाशक्ती वाढावी आणि कथेच्या माध्यमातून चांगले शिक्षण देणे हा “टॉडलर टेल्स”च्या वतीने पपेट शो व कथा सांगण्याचे सत्र आयोजित करण्याचा मुख्य उद्देश आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या पपेट शोमधून ससा-कासवाची गोष्ट, कोल्हा व द्राक्ष्यांची गोष्ट यासारख्या विविध अभ्यासक्रमातील गोष्टी अभिनव पद्धतीने पपेट शोच्या माध...

जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे प्रा. रफिक शेख यांचे पुस्तक प्रकाशित

Image
पुस्तकात “मशीन लर्निंग एंड आर्टिफिशियल इंटेलिजेंस”ची अभ्यासपूर्ण माहिती ; संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यासह सर्व स्तरातून प्रा. शेख यांचे कौतुक जळगाव , ता. ८  : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील मास्टर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन विभाग प्रमुख प्रा. रफिक जे. शेख यांनी लेखन केलेल्या “ मशीन लर्निंग एंड आर्टिफिशियल इंटेलिजेंस ”' या पुस्तकाचे प्रकाशन ता. ९ गुरुवार रोजी रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी , संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व रिसर्च एंड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक विद्यार्थी हे त्यांच्या अभ्यासाठी अनेक परदेशी लेखकांच्या पुस्तकावर अवलंबून असतात. मात्र स्थानिक प्रेसमधून अशा प्रकारचे पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे ही चांगली बाब असल्याचे कौतुकोद्गार संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी काढले. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस स्थित्यंतर आणि अनेक बदल होताना दिसतात , कालपरत्वे विद्यार्थ्यांच्याही...

“टॉडलर टेल्स”मध्ये रंगला चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव

Image
पहिला दिवस ; विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत जळगाव , ता. ७ : वर्गाच्या प्रवेशद्वारावर फुलांसह आंब्यांच्या पानांचे बांधलेले तोरण.. विद्यार्थ्यांचे औंक्षण तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत.. असे वातावरण सावखेडा ‎ ये थील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचलित टॉडलर टेल्समधील चिमुकल्यांचा प्रवेशोत्सवावेळी पाहायला मिळाले. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची टॉडलर टेल्स हि प्राथमिक प्ले ग्रुप ते सिनिअर केजी स्कूल सोमवार ता. ५ जूनपासून सुरू झाली. यावेळी नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती होती पण शिक्षकांकडून ढोल ताशांच्या गजरात झालेले अनोखे स्वागत पाहून चिमुकले भारावले. टॉडलर टेल्सच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी टॉडलर टेल्सच्या चिमुकल्यांचे स्वागत केले. सौ. राजुल रायसोनी यांनी विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल व चॉकलेट देत सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाच्या आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुख्याध्यापिका तेजल ओझा , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी आदींसह पालक , स्कूल कमिटी सदस्य उपस्थित होते.  ...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी एकसोबत पाहिला “३५० व्या शिवराज्याभिषेक"चा लाईव्ह सोहळा

Image
विध्यार्थी झाले नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार ; महाविध्यालयाच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक जळगाव , ता. ६ : स्वराज्याची स्थापना करण्याचं ध्येय घेऊन वयाच्या १६ व्या वर्षी शपथ घेणाऱ्या शिवरायांचे बरोबर ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘ छत्रपती ’ शिवाजी महाराज झाले! रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या घटनेला आज ३५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला गेला मात्र त्याचवेळी हा सोहळा फेसबुक , इन्स्टाग्राम , युट्यूबसह विविध वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारित करण्यात आले. त्याचा जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी हा सोहळा संपूर्ण लाइव्ह पाहत या राज्याभिषेक सोहळ्याचा लाभ घेतला. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते. रायसोनी महाविद्यालयाच्या प्रशस्त सभागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  ‘ शिवराज्याभिषेक ’ दिनानि...

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात “जागतिक पर्यावरण दिन” साजरा

Image
वृक्षारोपण व पोस्टर प्रकाशित करून दिली पर्यावरण रक्षणाची शिकवण ; विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग जळगाव ता.५ : येथील  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, “फस्ट क्लब” व इस्टीट्युट इनोव्हेशन कॉन्सील अंतर्गत “ जागतिक पर्यावरण दिन ” साजरा करण्यात आला. याप्रसंगी रायसोनी महाविद्यालयाचे अ‍ॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कडुलिंब , रुद्राक्ष , कदंब , देशी चिंच , जांभूळ , बहावा , हिरडा , बेहडा या औषधीयुक्त १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी प्रामुख्याने या औषधीयुक्त झाडांचा उपयोग होतो. या वृक्षरोपण कार्यक्रमाप्रसंगी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी पर्यावरणाचे महत्व सांगत ‘ एक व्यक्ती एक झाड ’ ही संकल्पना राबवली पाहिजे. अनेकदा वृक्षारोपणाचे कार्यक्रम संपन्न होतात परंतु लावलेल्या झाडांचे नंतर काय होते याकडे लक्ष दिले जात नाही. दुर्लक्षामुळे जमिनीत लावलेली झाडे फारशी टिकत नाहीत.त्यासाठी आता वृक्षारोपण करणे...

भविष्यात बिजनेस टिकवायचा असेल तर इनोव्हेशन टेक्नोलॉजी शिवाय पर्याय नाही: प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

Image
जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील बीसीए व एमसीए या शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न जळगाव , ता. २ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीसीए व एमसीए या शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच महाविध्यालयाच्या खुल्या सभागृहात पार पडला. यावेळी विध्यार्थ्यांसाठी विविध सांस्कुतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा देण्यात आल्या. या सामूहीक कार्यक्रमाचे अध्यक्षा रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे होते. तर अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत , एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख , बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे हे व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि , आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन युवक-युवतींनी रोजगारक्षम व्हावे तसेच नवतंत्रज्ञानामुळे उद्योगात बदल झाले असे नाही तर ते कालचे उद्योग आजही त्याच स्थितीत आहे फक्त त्याच्या यशस्वी मार्गक...