जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये ‘इनोव्हेशन लॅब’चे उदघाटन

जळगाव, ता. २ : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिकतर्फे सुरू करण्यात आलेल्या इनोव्हेशन लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नवनिर्मिती करण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला चालना व प्रोत्साहन मिळाले तर भविष्यात उद्योजक, शास्त्रज्ञ तसेच नवनिर्मिती करणारे चांगले व्यावसायिक घडू शकतील. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कल्पकता वापरून नवीन संशोधन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन इनोव्हेशन लॅबचे उदघाटक व श्रद्धा मॅटसचे व्यवस्थापकीय संचालक श्री. महेद्र रायसोनी यांनी केले.

विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणित अर्थात स्टीम या संकल्पनेवर आधारित या इनोव्हेशन लॅबमधून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे नाविन्यपूर्ण प्रयोग करता येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयातील नव्या संकल्पना रुजविणे व त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या आधुनिक प्रयोगशाळेद्वारे विध्यार्थी रोबोची निर्मिती करणार आहे. तसेच या प्रयोगशाळेत संशोधनासाठी आवश्यक विविध साहित्य, उपकरणे बसविण्यात आली आहे. त्यात थ्रीडी प्रिंटरपासून ते सर्वकाही उपलब्ध आहे. या प्रसंगी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी, मुख्याध्यापिका तेजल ओझा व ओरीयन स्कूलच्या मुख्याध्यापिका सुषमा कांची तसेच पालक, शिक्षेकेत्तर कर्मचारी व आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश