जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी सर्व विभाग प्रमुखांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावल्याने संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी केले विध्यार्थ्यांचे कौतुक..

शिष्यानीं आपल्या गुरुनां दिली भेट ; महाविद्यालयातील विध्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम ! जळगाव, ता.२८ : विश्वविख्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामुळेच समाजाला योग्य दिशा प्राप्त झालेली आहे. त्यांच्या कार्यातून प्रत्येकाला ऊर्जाप्रेरित संस्कार प्राप्त होत असतात. त्यांच्या कार्याचे अनुकरण केल्यास प्रत्येकाचे जीवन सफल होणार आहे. यामुळे त्यांच्या कार्याची दखल सामाजिक स्तरावर सामाजिक संस्थांनी घेणे अत्यंत गरजेचे असल्याने या पार्श्वभूमीवर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाच्या विध्यार्थ्यानी स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या सर्व विभाग प्रमुखांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावत विद्यार्थ्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्गाने आन...