Posts

Showing posts from November, 2022

आंतरशालेय कॅरम स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा “कार्तिक हिरे प्रथम”

Image
जळगाव , ता. ३० : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी जैन स्पोर्टस अॅकडमी आयोजित तसेच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. पुरस्कृत 12 वर्षाखालील आंतरशालेय जैन चँलेंज जिल्हास्तरीय कॅरेम स्पर्धेमध्ये कार्तिक हिरे याला प्रथम विजेतेपद , आरुष चौधरी द्वितीय , तर मिहीरसिंग मोर्य या विद्यार्थ्याने आंतरशालेय कॅरम स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले. तसेच या स्पर्धेत जीत गुजराथी व स्मित सावना या विध्यार्थ्यानीही सहभाग नोंदवत घवघवीत यश संपादन केले. याअनुशंगाने या विद्यार्थ्यांचा स्कूलच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन विजयी विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या दरम्यान उपस्थित विध्यार्थी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी नमूद केले कि , जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी तसेच क्रीडाशिक्षक संजय चव्हाण व सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी यासह सर्व पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच य...

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन

Image
जळगाव , ता. २८ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे करीअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संगणक , माहिती तंत्रज्ञान , आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स विभागातर्फे ओपन सोर्स टेक्नोलॉजी अॅन्ड करिअर ओपोर्च्युनिटीज या संकल्पनेवर करिअर मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. या वेळी ख्यातनाम संगणक तज्ज्ञ व कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता म्हणून मुंबई येथील रेड हॅट अकॅडमीच्या मोनिका गुगनानी या उपस्थित होत्या. या कार्यशाळेत त्यांनी रेड हॅट टूल त्यांचे सात कोर्सेस व त्यांच्या सर्टिफिकेशनचे विविध महत्व तसेच भविष्यातील नोकरी व्यवसाय अन् जीवनशैली याविषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चांदणी निमजे यांनी केले तर आभार श्रद्धा जगताप यांनी मानले. यावेळी संगणक , माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख सोनल पाटील , आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स विभागप्रमुख   प्रा. प्रमोद गोसावी व समन्वयिका प्रा. माधुरी झवर उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना रायसोनी इस्टीट्युटचे अकॅडमिक डीन प्रा....

जी. एच. रायसोनी वंडर किड्समध्ये रंगला चिमुकल्यांसाठी 'पपेट शो'

Image
पपेट शोच्या माध्यमाने सादर होणाऱ्या गोष्टीमध्ये रमले लहानगे ; स्कूलचा उत्स्फूर्त उपक्रम जळगाव , ता. २६ : शहरातील गणपती नगर येथील ' जी. एच. रायसोनी वंडर किड्स ' मधील प्ले ग्रुप , नर्सरी , ज्युनिअर केजी व सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ पपेट शो ’ चे सादरीकरण करण्यात आले. जी. एच. रायसोनी वंडर किड्सच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा व त्यांचे सहकारी शिक्षक वर्ग कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित होते. या संदर्भात माहिती देताना मुख्याध्यापिका तेजल ओझा म्हणाल्या की , विध्यार्थ्यासाठी खूप छान आणि वेगळे कथाकथन सत्र आयोजित करीत असून , विद्यार्थ्यांना कथा अशा प्रकारे जाणवेल की त्यांच्यासमोर कथेतील पात्रे खरी असतील. मुलांच्या ज्ञानात वाढ होण्याबरोबरच या चिमुकल्यांसाठीही याचा खूप फायदा होईल तसेच अभ्यासासोबतच मुलांची कल्पनाशक्ती वाढावी आणि कथेच्या माध्यमातून चांगले शिक्षण देणे हा वंडर किड्सच्या वतीने पपेट शो व कथा सांगण्याचे सत्र आयोजित करण्याचा मुख्य उद्देश आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या पपेट शोमधून ससा-कासवाची गोष्ट , कोल्हा व द्राक्ष्यांची गोष्ट यासारख्या विविध अभ्यासक्रमातील गोष्टी अ...

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेट महाविद्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

Image
महाविध्यालयात संविधान उद्देशिकेचे भव्य सामुहिक वाचन  ; विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती जळगाव , ता. २६ :  येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात शनीवार ता. २६ रोजी ‘ संविधान दिन ’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा ,  एमबीए विभागप्रमुख प्रा.डॉ. राजकुमार कांकरिया , एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख , प्रा. तन्मय भाले , प्रा.कल्याणी नेवे , प्रा. मोनाली शर्मा , प्रा.राहुल त्रिवेदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रफिक शेख यांनी केले. स्वातंत्र्य , समता आणि बंधुत्वाच्या त्रिसूत्रीवर आधारलेला , काळाबरोबर बदलण्याची क्षमता असलेला सर्वश्रेष्ठ कायदा म्हणजे संविधान हे सांगतानाच त्यांनी संविधानाच्या निर्मितीप्रक्रियेचा आढावा घेतला. तसेच यावेळी संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी , प्राध्यापकांकडून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले व संविधानातील उद्देशांचे पालन करतील व कायद्याची बांधिलकी मानतील ...

उद्योगात अमर्याद संधी, जशी मेहनत कराल, तसे यश मिळवाल : प्रसिद्ध उद्योजक प्रमोद संचेती

Image
जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “ एमबीए व एमसीए प्रथम वर्ष ” विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न जळगाव , ता. २४ : नोकरीत वेळ निघून जातो. सृजनशीलता , नावीन्याचा ध्यास आणि सतत कामाची सवय संपून जाते. मात्र उद्योगात अमर्याद संधी आहेत. जशी मेहनत कराल , तसे यश मिळते. मात्र उद्योग , व्यवसाय करण्यासाठी स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे , असे मनोगत जळगाव येथील विनले पॉलिमर्स प्रा. लीमिटेडचे संचालक प्रमोद संचेती यांनी जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयामधील प्रथम वर्ष एमबीए व एमसीए या विभागाच्या इंडक्शन कार्यक्रमावेळी व्यक्त केले. याप्रसंगी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा , एमबीए विभागप्रमुख प्रा.डॉ. राजकुमार कांकरिया , एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख हे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकेत नमूद केले की , रायसोनी इस्टीट्युट सदैव दर्जात्मक शिक्षण देण्यास आग्रही असते. करिअरच्या ठरलेल्या वाटांसोबतच वेगळ्या चाकोरी मोडणाऱ्या नवीन वाटांची ओळखही या कार्यशा...

यशस्वी भविष्यासाठी मोठी स्वप्न बघा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी योग्य मार्गाने मेहनत करा : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

Image
जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात  “ अभियांत्रिकी प्रथम वर्ष ” विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न जळगाव , ता. १७ – कोणतही यश सहजाजसहजी मिळत नाही. यशाला शॉर्टकट नसतो तर जिद्द मेहनत अन् अभ्यासात सातत्य असेल , तर निश्चित यश मिळतेच तसेच जिद्द , चिकाटी , परिश्रम व जबाबदारी हे गुण अंगी असल्यास विदयार्थ्यांना यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. तसेच भविष्यात समाजाच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. असा यशाचा कानमंत्र देत त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची व म्युझिक क्लब , डान्स क्लब , लेट्स टोक क्लब , टोस्ट मास्टर क्लब या विविध हॉबी क्लबची माहिती देत या क्लब मध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. व या विविध क्लबमुळे विध्यार्थ्यामध्ये संवाद कौशल्य , आत्मविश्वास , नेतृत्व गुण , टीमवर्क स्किल हे सारे कौशल्य आत्मसात होण्यास मदत हौवून  ही यशस्वी करिअरची एक उत्तम सुरवात आहे. चांगल्या बॉडी लँग्वेजने तुम्ही तुमचे करिअर उच्च स्तरावर नेऊ शकता व आजच्या काळात असे सर्वगुण संपन्नच युवकांची इंडस्ट्रीला गरज असल्याचे त्यांनी सांगितले व...

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेट महाविद्यालयात सायबर क्राईमवर कार्यशाळा

Image
जळगाव , ता. १५  : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांना सायबर गुन्ह्यांची व त्यापासून बचावासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात , यासंबंधी माहिती होण्यासाठी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालय आणि जळगाव सायबर क्राईम सेल यांच्यातर्फे “ सायबर सुरक्षितता आणि जागरूकता ” याविषयावर ता. १५ मंगळवार रोजी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव सायबर क्राईम सेलचे पोलीस नाईक सचिन सोनवणे व एमकेसीएल सायबर क्राईम अवरनेसचे समन्वयक उमाकांत बडगुजर हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पोलीस नाईक सचिन सोनवणे यांनी जळगाव जिल्ह्यात झालेल्या सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देत गुन्हेगार काय तंत्र वापरून कसे फसवतात याचे उदाहरण दिले. तसेच मोबाईल , इंटरनेट , ऑनलाईन अकाउंट आदीद्वारे विविध प्रकारे फसवणूक करण्यात येते. त्यांनी इंटरनेट , सायबर गुन्हेगारी म्हणजे नक्की काय ? युवकांनी या गुन्ह्यांच्या प्रभावापासून स्वत:चे कसे संरक्षण केले पाहिजे त...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी बालदिन उत्साहात साजरा

Image
स्पर्धांमध्ये रमले चिमुकले , विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद जळगाव , ता. १४ : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गणपती नगर येथील जी. एच. रायसोनी वंडर किड्समधील प्लेग्रुप व नर्सरीचे विद्यार्थीही जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये साजरा होत असलेल्या बालदिनाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला , बालगीत , वेशभूषा या स्पर्धा घेण्यात आल्या. सर्वप्रथम शिक्षकांद्वारे सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच , कार्यक्रमाची सुरुवात पंडित नेहरू व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व जी. एच. रायसोनी वंडर किड्सच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा देत चाचा नेहरू यांच्या जीवनातील काही प्रसंग गोष्टी रूपाने सांगितल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आपल्या रोजच्या अभ्यासातून थोडी उसंत मिळावी म्हणून शिक्षकांनी विविध सामूहिक खेळांचे आयोजन केले होते....

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिन व मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती उत्साहात साजरी

Image
वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे यशस्वी आयोजन ; तरुणाईचा विविध विषयांवर वैचारिक जल्लोष जळगाव , ता. ११ : भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ' राष्ट्रीय शिक्षण दिन ' दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी देशात साजरा केला जातो या निमित्त जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलतर्फे विद्यार्थ्यांसाठी वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “ रोल ऑफ एज्युकेशन टू सोल्व्ह सोशल अॅन्ड लोकल प्रोब्लेम्स इन सोसायटी ” या विषयावर यावेळी वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेंट शाखेतील विविध विभागातील विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेचे उद्घाटन रायसोनी इस्टीट्युटचे अॅकडमीक डीन प्रा. डॉ प्रणव चरखा यांनी केले. यावेळी त्यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून काम केले. 2008 मध्ये , मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांचा वाढदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला. तेव्हापासून दरव...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात रोटरेक्ट क्लबतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Image
रोटरेक्टचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. आनंद झुनझुनवाला व डॉ. पंकज शहा यांची महाविद्यालयाला भेट जळगाव , ता. ९ : मानव हा समाजाचा प्रमुख घटक आहे. सामाजिक विकास करणे ही त्याची प्राथमिक जबाबदारी असते. भारत हा तरुणाचा देश आहे. त्यामुळे तरुण भारत हा स्वच्छ आणि आरोग्य संपन्न असलाच पाहिजे. देशात विविध सामाजिक संस्था समाजाच्या विकासाकरिता तत्पर आहेत. परंतु रोटरेक्ट क्लब फक्त देशासाठी नाही तर जगासाठी विकास साध्य करू पाहत आहे तसेच हा क्लब देशातील विविध ग्रुप सोबत जुळत एक सकारात्मक चळवळ उभी करत आहे. तसेच आपण एक सामाजिक घटक म्हणून समाजाप्रती देनं लागतो याची जाणीव ठेवून प्रत्येकाने जगायला शिकले पाहिजे असे मत रोटरेक्टचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. आनंद झुनझुनवाला यांनी व्यक्त केले.  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईटतर्फे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. आनंद झुनझुनवाला , डॉ. पंकज शहा व निलेश झवर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी स...

निसर्गाच्या सानिध्यात अनुभवली जी. एच. रायसोनी वंडर किड्सच्या विध्यार्थ्यानी रम्य ‘सकाळ’ !

Image
एक दिवसीय शैक्षणिक सहल संपन्न ; अहिंसा तीर्थ येथील गो संगोपन , उपपदार्थ निर्मितीचे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले महत्व जळगाव , ता . ५ : पक्ष्यांचा किलबिलाट ... गाईंचा हंबरडा आणि सोबत सूर्याची कोवळी किरणे झेलत जी . एच . रायसोनी वंडर किड्सच्या विध्यार्थ्यानी कुसुंबा येथील अहिंसा तीर्थ तथा रतनलाल सी . बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रामध्ये २६ एकरवरील निसर्गाची सफर केली . २३०० गाईंचे संगोपन , झाडे , वेली , पशु - पक्षी , जैविक शेतीसह दूध , तूपनिर्मिती , शेणापासून सेंद्रिय खत , दंतमंजन , शाकाहार प्रसार व येथील जैवविविधता पाहून सर्व लहानग्याची मने प्रफुल्लीत झाली . निमित्त होते जी . एच . रायसोनी वंडर किड्सतर्फे शनिवारी ता . ५ रोजी आयोजित केलेल्या कुसुंबा येथील अहिंसा तीर्थ शिवारभेटीचे . सुरवातीला रायसोनी वंडर किड्सच्या नर्सरी , ज्युनिअर केजी व सिनिअर केजी च्या विध्यार्थ्यांसह स्कूलच्या शिक्षकाचे येथे स्वागत करण्यात आले . यानंतर येथील विविध संत , महा पुरुषांच्या प्रतिमा पाहत येथील स्वयंसेवकांनी विद्य...

प्राध्यापकांनी आपल्या नियमित अध्यापनाबरोबरच संवाद व व्यवस्थापन कौशल्य समृद्ध करणे गरजेचे : ट्रेनर प्रा. राहुल त्रिवेदी

Image
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी ‘ फँसिलीटेशन व कम्युनिकेशन स्किल्स ‘ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा फोटो ओळ : रायसोनी महाविध्यालयातील कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शन करतांना डेल कार्निगी सर्टीफाईड ट्रेनर प्रा. राहुल त्रिवेदी जळगाव , ता. १ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करताना महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण कसे देता येईल याचाच प्रामुख्याने विचार केला आहे. याच उपक्रमांतर्गत रायसोनी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून त्याच उपक्रमांतर्गत कार्निगी सर्टीफाईड ट्रेनर प्रा. राहुल त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापकांसाठी ‘ फँसिलीटेशन व कम्युनिकेशन स्किल्स ‘ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , अकॅडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व आदींची उपस्थिती होती ‘ फँसिलीटेशन व कम्युनिकेशन स्किल्स ‘  ...