जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी इंधनबचतीसाठी बनवली पर्यावरणपूरक “पॅराबोलिक सौर चूल”

रायसोनीच्या विध्यार्थ्यांचा लोकोपयोगी शोध ; संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी केले प्राध्यापक व विध्यार्थ्यांचे कौतुक जळगाव , ता. ३१ : दिवसेंदिवस वाढणाऱ्या एलपीजीच्या किमतींमुळे अनेक घराचं बजेट बिघडत चाललं आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत आता एक हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. या वेगाने वाढणाऱ्या गॅसच्या किमतीमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. यातून सुटका करण्यासाठी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरच्या विध्यार्थ्यानी नवा पर्याय समोर आणला असून या सेंटरचे विध्यार्थी नवीन सौर चूलीवर काम करत आहे. या सौर चूलीला “ पॅराबोलिक सौर चूल ” असं नाव देण्यात आले आहे. ग्राहक ज्यावेळी ही सौर चूल खरेदी करायला जाईल , फक्त त्याच वेळी त्याला मोजके पैसे मोजावे लागतील , परंतु त्यानंतर मात्र कोणताही खर्च ग्राहकाला करावा लागणार नाही. देखभाल आणि महिन्याचा कोणताही अतिरिक्त खर्च करावा त्याला लागणार नाही. ज्या पदार्थांना शिजवण्यासाठी जास्त तापमानाची आवश्यकता असते , त्याकरिता पॅराबोलिक सौर चुलीचा वापर होतो. सौर पॅराबोलिक कुकरचा उपयोग ५ त...