जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे "शिक्षक दिन" मोठ्या उत्साहात साजरा
जळगाव, ता. ५ : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे शिक्षक दिन मोठ्या
उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून स्कूलच्या संचालिका
सौ. राजुल रायसोनी आणि प्रमुख पाहुण्या म्हणून स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा
उपस्थित होत्या. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात शिक्षक
दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याअनुषंगाने जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे
शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष व
प्रमुख पाहुण्या यांच्या हस्ते सरस्वती पूजन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या
प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. सर्वप्रथम विद्यार्थ्यांद्वारे सर्व शिक्षकांचे
स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दलचा आदर व्यक्त
करतांना भाषणे, नृत्य, नाटक, व विविध गीते प्रस्तुत केले तसेच माध्यमिक वर्गातील
काही विध्यार्थ्यानी शिक्षकांची वेशभूषा करत त्यांची शिक्षकांची भूमिका निभावली.
याप्रसंगी शिक्षकांना आपल्या कार्यातून थोडी उसंत मिळावी म्हणून विद्यार्थ्यांनी
विविध सामूहिक खेळांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाबद्दल स्कूलचे अमन पांडे व लीना
त्रिपाठी या शिक्षकांद्वारे आपले विचार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष
व संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमाच्या उत्कृष्ट
आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करत उपस्थित शिक्षकांना त्यांनी भेटवस्तू
दिल्या. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा
यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्व विद्यार्थ्यांचे
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक
विद्यार्थिनी ऋतुजा भंडारी व आशिता रायसोनी तसेच
सूत्रसंचालन देवश्री चंद्रवंशी, हर्ष पाटील, कनक सोनवणे, मनन छाजेड, सय्यम लुंकड, श्रावस्ती कोचुरे, सिद्धांत काबरा यांनी केले. तसेच आर्ष पंती, अनया पालोद, इद्रिस चश्मावाला, लाभी पांगरिया, नमी रांका, श्लोक महाजन, सौम्या काबरा, सृष्टी काबरा, आरुष चौधरी, अद्वैत पाटील, अनय आहुजा, फातेमा चश्मावाला, गीत जैन, हिमांशू रंगलानी, हुनी वालेचा,जित गुजराती, कलश मुंदडा, कार्तिक हिरे, कृतांश सुराणा, कुश हसवानी, लव हसवानी, मिहीरसिंग मौर्य, नैतिक कोठारी, नक्षत्र राणे, नमन जैन, निरव जैन, पेहेल गडीया, रुद्र मत्तानी, समिक्षा जैन या विध्यार्थ्यानी शिक्षकांच्या भूमिका वठवल्या .या कार्यक्रमाचे
आभार प्रदर्शन स्मिथ सावना याने केले. सर्व विद्यार्थ्यांद्वारे यशस्वीरित्या
आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment