रायसोनीच्या विध्यार्थ्यानी वृक्षांची मैत्री करून केला “मैत्री दिन साजरा”

 रायसोनी महाविद्यालयातर्फे उमाळा परिसरात वृक्षारोपण

जळगावता. ८ :  शहरातील रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे मैत्री दिनाचे औचित्य साधून उमाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास रॉटरेक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट विध्यार्थी सदस्यांच्या व एमबीए विभागाच्या विध्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. फक्त झाडे लावून उपयोग नाही त्यांची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. झाडे आहेत म्हणून आपण आहोत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे तसेच वातावरणात ऑक्सीजन निर्माण करण्यासाठी झाडे महत्वाची आहेत. झाडामुळे जमिनीची गुणवत्तात व हवेची गुणवत्ता सुद्धा वाढविली जाते हे पटवून देत या बरोबरच वृक्षसंवर्धनाची शपथही विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. अग्रवाल यांनी दिली. या वेळी वडपिंपळकडूलिंबगुलमोहर इत्यादी वृक्षाचे वृक्षारोपण उमाळा परिसरात करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईटचे सदस्य यश लढढालक्ष्मी शेलारविवेक पाटीलकांचन माळी,  लोकेश पारेखसंभव मेहतासाक्षी वाणीसंदेश तोतलाविवेक वाणीज्ञानल बोरोलेकाजल बारीदिव्यांका सोनवणेपूजा चौधरीप्राजक्ता पाटीलजयराज चव्हाणहर्षदा मोगरेहर्षाली पाटीलजागृती निकमराधिका दायमामंजिरी वाळकेमानसी पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे समन्वय प्रा. श्रिया कोगटा यांनी साधले तर एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया, प्रा. राहुल त्रिवेदीप्रा. प्राची जगवाणीप्रा. प्रतीक्षा जैनप्रा. परिशी केसवानीप्रा. डॉली मंधान यांनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश