आझादी का अमृत महोत्सवानिमित्त ‘जी. एच. रायसोनी महाविद्यालया’मध्ये भरगच्च उपक्रम
रक्तदान शिबीर, जुने कपडे दान, देशभक्तीपर गीते व नृत्य स्पर्धा तसेच शहरातील काव्यरत्नावली चौकात पथनाट्यासहित समूहनृत्य व गीतांचा कार्यक्रम झाला सादर
जळगाव, ता. १० : भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि देशप्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागावी, या उद्देशाने जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये आज ता. १० बुधवार रोजी सकाळच्या सत्रात ७५ विध्यार्थ्यानी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजासह सेल्फी काढून हर घर तिरंगा उपक्रमाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले होते त्या अनुषंगाने महाविध्यालयातील विध्यार्थ्यानी राष्ट्रध्वजासह सेल्फी काढले.तर दुपारच्या सत्रात महाविद्यालयाच्या अँम्फी थिएटरमध्ये विध्यार्थ्यानी देशभक्तीपर गीते व नृत्य स्पर्धेत आपली कला सादर करत विविध पारितोषिके पटकावली. तसेच तिसऱ्या सत्रात म्हणजेच सायंकाळी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काव्यरत्नावली चौकात हर घर तिरंगा मोहिमेची जनजागृती करण्यासाठी 'एक शाम देश के नाम' या शीर्षकाखाली विध्यार्थ्यानी शहरातील नागरिकांसमोर पथनाट्यासहित समूहनृत्य व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करून सामान्य जनतेत देशप्रेमाची भावना निर्माण केली. त्यात ‘ घरोघरी तिरंगा फडकवू स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू, हर घर तिरंगा लढा महान-माझा तिरंगा माझी शान, तिरंगे को सलामी हमारी शान है, हर घर तिरंगा हमारी पहचान है’ आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी तिरंगा ध्वज फडकवण्या संदर्भातील नियमांविषयीची माहिती शहरातील नागरिकांना व्हावी, यासाठी पथनाट्यातून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील काही विध्यार्थ्यानी आपले जूने कपडे गरिबांना दान करून आदर्श निर्माण केला. तसेच रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले की, भारताचा आर्थिक व सामाजिक विकास मोठ्याप्रमाणात झाला असल्याने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नाप्रमाणे आपल्या देशाची महासत्तेकडे वाटचाल सुरु झाली असून, या अनुषंगाने आपल्या विध्यार्थ्यानी बाहेरच्या इतर देशात जाऊन नौकरी किंवा शिक्षण घेण्यापेक्षा आपल्या देशातच राहुन प्रगती करावी कारण उच्चशिक्षणासाठी आज भारतातील अनेक शेक्षणिक संस्था मोठ्या ताकदीने विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहे. त्यामुळे आज भारतातील प्रत्येक युवकाने आपल्या भारताचा आर्थिक स्तर कसा उंचावेल तसेच आपल्या देशातील उद्योगक्षेत्र अधिक प्रगती कशी करेल याचा हट्टहास धरायला हवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला प्रा.श्रिया कोगटा, प्रा. वसीम पटेल, प्रा. रफिक शेख, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. तन्मय भाले, रजिस्टार अरुण पाटील, प्रकाश पाटील, प्रा. सोनल तिवारी, प्रा.डॉली मंधान यासह रॉटरेक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट विध्यार्थी सदस्यांचे व रेडक्रॉस रक्तपेढीचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment