रायसोनी महाविद्यालयात विविध क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या मार्गदर्शकांसोबत संवाद
अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग
जळगाव, ता. १३ : मिनिस्टरी ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेल या भारत सरकारच्या अग्रगण्य संस्थेद्वारे भारतातील विविध तांत्रिक व व्यवस्थापकीय शिक्षण संस्थामध्ये उद्योकता विकास तसेच स्टार्टअपवर मागर्दर्शन करण्याकरिता विविध प्रकारचे आन्ट्रप्रनर्शिप डेव्हलपमेट क्लबची स्थापना कराव्यात अशा मार्गदर्शक सूचना “एमएचआरडी”ने केल्या असून या अनुषंगाने शहरातील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात इस्टीट्युशन इनोव्हेशन कॉन्सिल कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचे प्रेसिडेंट प्रा. डॉ. प्रणव चरखा यांच्या संकल्पनेतून नुकताच “इम्पॅक्ट लेक्चर सिरीज” या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होत. यावेळी या कार्यक्रमात पंजाब येथील के सी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या कॅम्पस डायरेक्टर डॉ. रश्मी गुजराती, वाराणसी येथील व्यवस्थापन विज्ञान स्कूलचे डीन डॉ. राजकुमार सिंग गौतम तसेच मुंबई येथील इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेजचे संचालक डॉ आशिष पानत व औरंगाबाद येथील मॅजीआयसीच्या संचालिका श्रीमती मैथिली तांबोळीकर यांनी सहभाग नोंदविला. यावेळी या वक्त्यांनी इनोव्हेशन, आयपीआर, उद्योजकता, स्टार्टअप आणि इनक्यूबेटर्सच्या विविध पैलूंवर चर्चा केली तसेच 'स्टार्टअप इंडिया' योजना घोषित झाल्यानंतर उद्योजकता विकासास वेग प्राप्त झाला आहे. लहान शहरातील उद्योजकही यात प्रगती करीत आहेत. क्षेत्रीय स्तरावरील ही लक्षणीय क्षमतेला चालना देण्याच्या उद्देशाने ‘स्टार्टअप इंडिया'चे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून लहान शहरातील आश्वासक उद्योजकांना आकर्षित करणे, त्यांना त्यांच्या उद्योजक होण्याच्या आकांक्षा पूर्तीसाठी मंच उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे महाविद्यालयातील विध्यार्थी शिकत असतानाच आपला स्टार्ट अप सुरु करू शकतात व काही अडचणी आल्यास केंद्र शासनाने उपलब्ध केलेल्या विविध सेवा माध्यमाचा वापर करून आपल्या नवउद्योगाला चालना देवू शकता असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मार्गदर्शकांनी केले. या कार्यशाळेचे समन्वयक आयआयसी तसेच रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंटचे विभागप्रमुख प्रा. सौरभ गुप्ता हे होते. तर सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment