जी. एच. रायसोनी महाविद्यालयात“एलुमनी कॉफी कप मिट”चे आयोजन
जळगाव,ता. १२ – येथील जी. एच. रायसोनी बिजनेस मनेजमेंट महाविद्यालयात “एलुमनी कॉफी कप मिट”च्या निमित्ताने एखाद्या उद्योगात किंवा कंपनीत यशस्वी मार्गक्रमण करणाऱ्या माजी विध्यार्थ्याना आमंत्रित करण्यात येते, म्हणजेच कि त्यांनी महाविद्यालयात यावे, त्यांच्या कार्यक्षेत्राशी महाविद्यालयाचा वेगवेगळ्या पातळीवर सहकार्याचा सेतू तयार व्हावा, संस्थेशी ऋणानुबंध कायम राहावा, विद्यार्थ्यांशी संवाद घडावा, या हेतूने दर महिन्यात असा उपक्रम होत असतो. या अनुषंगाने महाविदयालयाच्या २०१२ बॅचचे माजी विद्यार्थी व ट्रेडर्स पॅव्हेलियनचे संचालक श्री. अमित जैन यांनी नुकतीच महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी विदयार्थींशी सुसंवाद साधला, रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “एलुमनी कनेक्ट” या कार्यक्रमाअंतर्गत अमित जैन हे एमबीए विभागाच्या विध्यार्थ्यांशी बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, एलुमनी कॉफी कप मिट या उपक्रमामुळे आमच्या महाविद्यालयाचा, व या महाविद्यालयातून शिकून गेलेल्या माजी विध्यार्थ्यांचे संबध अधिक बळकट होत असून यामुळे इंडस्ट्रीमध्ये सध्याला सक्रीय असलेले माजी विध्यार्थ्यांचे विविध सकारात्मक अनुभव आताला सक्रीय असणाऱ्या विध्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात उपयोगात येतात, तसेच या कार्यक्रमामुळे विध्यार्थ्यांना करिअर गाईडन्स देखील मिळत असल्याचे रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी यावेळी सांगितले तसेच आपल्या मार्गदर्शनात पुढे बोलतांना श्री अमित जैन यांनी महाविध्यालयातून पदवी पूर्ण केल्यानंतर फ्रेशर्सना ऑफर केल्या जाणाऱ्या विविध संधीबद्दल सांगितले तसेच फायनान्स, मार्केटिंग आणि एचआर जॉबसाठी विविध प्रोफाइलवर प्रकाश टाकला. त्यांनी वेल्थ अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, फायनान्स रिसर्च अॅनालिस्ट, फायनान्शिअल कन्सल्टिंग, ब्रँड मॅनेजर, सेल्स मॅनेजर याविषयी चर्चा केली. बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, एसइओ मॅनेजर, डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, एचआर एक्झिक्युटिव्ह, टॅलेंट एक्विझिशन मॅनेजर, ट्रेनर, एचआर ह्युमन रिसोर्स जर्नालीस्ट यासह सर्वोच्च खाजगी कंपन्यांव्यतिरिक्त बँकिंग, रेल्वे, अध्यापन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, क्रीडा, विमानसेवा, आरोग्यसेवा यासारख्या सरकारी क्षेत्रात एमबीए केल्यानंतर नोकऱ्याही मिळू शकतात असे सांगत स्टार्टअपच्या विविध पर्यायाबाबतही त्यांनी चर्चा केली. तसेच यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्येही त्यांनी विध्यार्थ्यांसमोर मांडत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि चालवताना येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे समन्वयक प्लेसमेंट डीन प्रा. तन्मय भाले हे होते तर या कार्यक्रमास एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया यासह विदयार्थी, प्राध्यापक व प्राध्यापक्केतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment