रायसोनी महाविद्यालयात “जागतिक पर्यावरण दिन” साजरा

वृक्षारोपण व प्रभातफेरी काढून पर्यावरण रक्षणाची दिली शिकवण

जळगाव ता.६ : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात इंटरनॅशनल इनोव्हेशन कॉन्सील अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनसाजरा करण्यात आला. याप्रसंगी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कडुलिंब, रुद्राक्ष, कदंब, देशी चिंच, जांभूळ, बहावा, हिरडा, बेहडा या औषधीयुक्त १५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी प्रामुख्याने या औषधीयुक्त झाडांचा उपयोग होतो. या वृक्षरोपण कार्यक्रमाप्रसंगी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी पर्यावरणाचे महत्व सांगत एक व्यक्ती एक झाडही संकल्पना राबवली पाहिजे. अनेकदा वृक्षारोपणाचे कार्यक्रम संपन्न होतात परंतु लावलेल्या झाडांचे नंतर काय होते याकडे लक्ष दिले जात नाही. दुर्लक्षामुळे जमिनीत लावलेली झाडे फारशी टिकत नाहीत.त्यासाठी आता वृक्षारोपण करणे व त्याचे संगोपन करणे काळजी गरज आहे. वृक्षारोपणाचा विचार एकदा पक्का झाला की आपोआप आपले हात वृक्ष संगोपनाकडे वळू लागतील. त्यामुळे वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करा, असे ते म्हणाले. वृक्षरोपण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅकेनिकल अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपेन कुमार रजक, प्रा. अमोल जोशी, प्रा. वासिम पटेल व रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंटचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता यांचे सहकार्य लाभले तसेच यावेळी विध्यार्थ्यानी पर्यावरण रक्षणाचे विविध पोस्टर तयार करत प्रभात फेरी काढून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती केली. यावेळी विध्यार्थ्यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग होता. या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले. 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश