राष्ट्रीय शैक्षणिक धोरणच उच्च शिक्षणाच्या दर्जाला उंची प्रधान करू शकते

रायसोनी महाविद्यालयातील नॅक प्रमाणित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020या राष्ट्रीय परिषदेत एकवटला मार्गदर्शकाचा सूर ;स्कॉलर विध्यार्थ्यानी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग

जळगाव, ता.४ : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात ता. ४ रोजी भारताच्या 2020 मधील शिक्षणाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यामध्ये आयक्यूएसी ची भूमिकाया विषयावर नॅक प्रमाणित ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, महाराष्ट्र ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट असोसिएशन पुणेचे डॉ.शीतलकुमार रवादले, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, पुणे येथील सुर्यदत्त इस्टीट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शैलेश कासंदे, रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अभियांत्रिकीचे अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 ची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची जबाबदारी असून स्वायत्त रायसोनी महाविद्यालयात डबल डिग्री प्रोग्राम, अॅकड्मिक बँक क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची रायसोनी महाविध्यालयात आधीपासूनच सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 च्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु आहे. तसेच त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती देत विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असते असे सांगितले यानंतर कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे यांनी नमूद केले कि रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालय हे प्रथम असे महाविध्यालय आहे कि, ज्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 च्या अंमलबजावणीवर विचारमंथन करण्यासाठी हि पहिली परिषद आयोजित केली त्यासाठी त्यांचे अभिनंदन तसेच त्यांनी सांगितले कि कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची देखील या मार्गाने वाटचाल सुरु असून समिती स्थापन करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासबंधी विविध कार्य सुरु आहे व त्यानुसार चाॅइस बेस क्रेडीट सिस्टीम, संशोधन, बहुविध्याशाखीय दृष्टीकोन, अॅकड्मिक बॅक ऑफ क्रेडीट, स्टार्टअप या विषयांवर विद्यापीठ भर देत आहे. तसेच प्रत्येक महाविध्यालयात इनोव्हेशन इनक्युबेशन सेंटर असावे यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सर्व महाविध्यालयाना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शेवटी नमूद करताना ते म्हणाले कि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर भविष्यात विद्यापीठ नक्कीच उत्तम काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यकाळात  यानंतर प्रथम सत्रात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी म्हटले कि कला, वाणिज्य, सायन्स किंवा अन्य शाखा यांना वयेक्तिक साच्यात न ठेवता सर्वाना एकत्रित आणत सकारात्मक दृष्टीकोनाने नवनवीन स्टार्टअप, संशोधन आपण घडवले पाहिजे तसेच त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 नुसार आजच्या काळजी गरज आपापसात स्पर्धा नसून एकत्रित काम करणे, संशोधन, कनेक्ट व प्राध्यापकांमध्ये सक्षमीकरण यावर मार्गदर्शन केले. यानंतर द्वितीय सत्रात महाराष्ट्र ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट असोसिएशन पुणेचे डॉ.शीतलकुमार रवादले यांनी विध्यार्थ्यांनी रोजगारक्षम होण्यासाठी महाविद्यालयांनी कुठकुठल्या पद्धतीच्या युक्त्या वापरायला हव्यात या संदर्भातले सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी यावेळी शिक्षकांनी आपण शिकवीत असलेला अभ्यासक्रम संपवण्याच्या मागे न लागता आपला विध्यार्थी रोजगारक्षम कसा होईल याचे सातत्याने प्रयत्न करावे व अभियांत्रिकीच्या चारही वर्षात ओद्योगिक सबंधी प्रोजेक्ट ठेवावे जेणेकरून विध्यार्थाना त्याचा अधिक फायदा होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर तृतीय सत्रात सुर्यदत्त इस्टीट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शैलेश कासंदे यांनी गुणवत्ता योग्य अभ्यासक्रम, शिक्षकांचे अध्यापन कौशल्य, शिक्षण पद्धतीचे अंकेषण आणि त्यायोग्य रोजगारनिर्मितीचे धडे दिले तसेच त्यांनी यशस्वी व्हायचे असेल तर आजच्या जगात चौकस नजर असावी लागते असा सल्ला उपस्थिताना दिला. सदर कार्यक्रमाचे समन्वयक आयक्यूएसीचे डीन प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया हे होते तर आभार असोसिएट अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. मकरंद वाठ यांनी मानले तसेच प्रा. राहुल त्रिवेदी व प्रा. बिपासा पात्रा यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, प्रा. डॉ. मोनाली शर्मा व आदींनी परिषदेला सहकार्य केले कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले. 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश