रायसोनी महाविद्यालयात “अभियांत्रिकेतील उद्योजकता आणि नाविन्यता” या विषयावर कार्यशाळा

जळगाव, ता. १ : रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात संगणक विभागाकडून अभियांत्रिकेतील उद्योजकता आणि नाविन्यता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या इनोव्हेशन आणि इनक्यूबेशन सेलचे व्यवस्थापक व चार्टड अभियंता निखील कुलकर्णी यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल अभियांत्रिकीचे अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत निखील कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले कि नाविन्यपूर्ण प्रकल्प कशा प्रकारे आपल्या उद्योगात अमलात आणू शकतो हे विविध उदाहरणे देत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकाचे निरसरणही श्री. कुलकर्णी यांनी केले. सदर कार्यक्रमात दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. कार्याशाळेच्या आयोजनासाठी प्रा. स्वाती पाटील, प्रा. हिरालाल सोळुंके, प्रा. शीतल जाधव, प्रा. डॉ. प्रेमनारायण आर्या, प्रा. मयांक नामदेव, प्रा. अंकुर पांडे, प्रा. मोहित तौमर, प्रा.प्रिया टेकवाणी, प्रा.स्वाती बाविस्कर यांनी सहकार्य केले तर या कार्यशाळेचे सूत्रसंचालन चांदणी निमजे यांनी केले तसेच या कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश