रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात तंबाखूमुक्त अभियान संपन्न

जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयात ता. २ सोमवार रोजी तंबाखूमुक्त अभियानराबविण्यात आले. 

व्यसनमुक्तीसाठी युवा पिढीमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे,हे या अभियानांतर्गत दिसून येते. तंबाखू सेवन, धुम्रपान करणे, हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे आपल्या जिवाला धोका निर्माण होतो. धुम्रपान ही एक अशी सवय आहे कि जी आपले पूर्ण जीवन उध्वस्थ करून टाकते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर सारखे आजार होतात.बिडी,सिगारेट,ड्रग्ज,दारू यांसारख्या व्यसनांच्या आधीन होणे,म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे असे महत्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आले. तंबाखूचे दुष्परिणाम सांगून तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत भिंतीपत्रक लावण्यात आले.एक दो एक दो ,बिडी, सिगारेट, तंबाखू छोड दो”, आता करा एकच काम तंबाखूला राम राम,”आता करा एकच नारा करूया तंबाखूमुक्त परिसर साराअसे नारे देत विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सदर कार्यक्रमात रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी मार्गदर्शन केले तर प्रा. संदीप पाटील, प्रा. शितल किंग, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. गायत्री भोईटे, प्रा. प्रियांका मल, प्रा. राहुल यादव, अनिल सोनार, संतोष मिसाळ यांचे सहकार्य लाभले. तर कार्यक्रमात पालकांनीही मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदिवला होता. या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश