रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड

जळगाव प्रतिनिधीता. ११ :  शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मनेजमेंट महाविदयालयाच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभाग उत्कृष्ट नियोजन करीत विद्यार्थ्यांच्या विविध तांत्रिक सॉप्ट स्किल्सवर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यात अत्यंत महत्वाची भुमिका बजावत असते. याच अनुषंगाने कॉम्प्युटर क्षेत्रातील “सायबेज सॉफ्टवेअर प्रा. ली” या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.  अशी माहिती रायसोनी बिजनेस मॅनेजमेंटच्या संगणकशास्त्रविज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. सोनल पाटील यांनी दिली. 

सायबेज सॉफ्टवेअर प्रा. ली.” या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागातील जागृती पारधे, अभय पाचपांडे, अथर्व जखोटे, चेतन महाजन, मयुरेश्वर चंदनकर, मयुरी सोनवणे, राहुल रानवे, प्रेम शिंपी, सिंचन पाटील, श्रिया पोळ, उर्मिला पाटील, मानसी महाजन      या बारा विद्यार्थ्यांची निवड केली. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रायसोनी महाविद्यालयाचे  विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात  याचा सखोल अभ्यास करून मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले,  ऑफिसर प्रा. हर्षद पाटील, प्रा. स्वाती पाटीलप्रा. हिरालाल साळुंखेप्रा. मनीष महालेप्रा. अभिषेक ढोरेप्रा. शितल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल,  अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा प्रा. रफिक शेख प्रा. राज कांकरिया आदींनी अभिनंदन केले़.


Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश