रायसोनी महाविध्यालयात सॅप इआरपी सॉंफ्टवेअर या विषयावर ऑनलाईन व्याख्यान संपन्न
रायसोनी महाविध्यालयातील ऑनलाईन कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्रमुख पाहूणे सर्टीफाईड फायनान्स कन्सल्टंट व असेंजरचे टीम लीडर विनय राखेचा जळगाव ता. ३१ : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातील संगणक, माहिती तंत्रज्ञान, आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स विभागांतर्गत सॅप इआरपी सॉंफ्टवेअर व सॅप सर्टीफाईड कन्सल्टंट या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्टीफाईड फायनान्स कन्सल्टंट व असेंजरचे टीम लीडर विनय राखेचा, रायसोनी बिजनेस मॅनेजमेटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा , संगणक अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील यांनी आजच्या बदलत्या ओद्योगीक जगाचा आढावा घेत प्रत्येक तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. विध्यार्थ्यानी संगणक क्षेत्रातील नवनवीन बाबी शिकाव्यात व त्यातील कौशल्य अवगत करावे तसेच रायसोनी इस्टीट्युट सदैव दर्...