उद्या रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात “माजी विद्यार्थी मेळावा”

जळगाव ता. १७  - येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा उद्या (ता. १७) रोजी होत आहे. यावेळी रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल तसेच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहसंचालक प्रा. डॉ. प्रणव चरखा हे उपस्थित राहणार आहे. प्रतिवर्षी डिसेंबरच्या तीसऱ्या शनिवारी असा मेळावा होत असतो. यंदाच्या मेळाव्यासाठी २००७ ते २०२० चे माजी विध्यार्थी विशेष निमंत्रित आहे. सदर मेळाव्याची माहिती देतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले, की ‘‘आमचे माजी विद्यार्थी जगभरात विखुरले आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी महाविद्यालयात यावे, त्यांच्या कार्यक्षेत्राशी महाविद्यालयाचा वेगवेगळ्या पातळीवर सहकार्याचा सेतू तयार व्हावा, संस्थेशी ऋणानुबंध कायम राहावा, विद्यार्थ्यांशी संवाद घडावा, या हेतूने दरवर्षी असा मेळावा होत असतो. सदर मेळाव्याचे मुख्य संयोजक प्रा. तन्मय भाले, प्रा. हर्षद पाटील, प्रा. सोनल पाटील, प्रा. भूषण राठी व आदींच्या सहभागाने संयोजन समितीचे सर्व सदस्य या मेळाव्यासाठी परिश्रम घेत आहेत.


Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश