आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी रायसोनीच्या विध्यार्थ्याची निवड



फोटो ओळ :- भरत चौधरी यांचे अभिनंदन करताना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, क्रीडा संचालक संजय जाधव व प्रा. रफिक शेख  

जळगाव, ता. १७  : ओडीसा येथील आय आय  टी, भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या बीसीए प्रथम वर्षाच्या भरत दिलीप चौधरी या विध्यार्थ्यांची  निवड करण्यात आली आहे. भरत चौधरी हा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे भुवनेश्वर येथे होणाऱ्या  जलतरण  स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहे.  ही स्पर्धा २० ते २४ डिसेंबर या कालावधीत होणार असून भरत चौधरी या विध्यार्थ्याला रायसोनी महाविध्यालयाचे क्रीडा संचालक संजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रीतम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले आहे.      

 

 



Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश