रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड

जळगाव ता. ७ : रायसोनी बिजनेस मॅनजमेट महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने आयोजीत केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कोग्निझेंट, एक्सेचर, हिताची या साॅफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने १२  विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकऱ्यांसाठी निवड केली आहे, अशी माहिती रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील मॅकेनिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख  प्रा. डॉ. दिपेन कुमार रजक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच विभाग प्रमुख  प्रा. डॉ. दिपेन कुमार रजक, प्रा. वसिम पटेल, प्रा. अविनाश पांचाळ, प्रा. शिवजी कुमार, प्रा. जितेंद्र वढोदकर, प्रा. सौरभ गुप्ता, प्रा. अमोल जोशी यांनी निवड झालेल्या निकिता चौधरी, ऋतुजा कुंभार, निखील भांडारकर, कौस्तुभ सोनगिरे, शुभम पाटील, हर्षल सोनार, दुर्गेश पाटील, हर्षल बारी, हर्षल चंदाने, रामेश्वर भरणे, ललित पाटील, भावेश राणे यांचा सत्कार केला. सत्कार प्रसंगी विध्यार्थ्यानी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीची प्रचंड महत्वाकांक्षा होती. चांगले गुण असल्यामुळे येथे प्रवेश मिळाला आणि आमचे पालक निश्चिन्त झाले. कारण येथुन बाहेर पडणाऱ्या विध्यार्थ्याला नोकरी मिळवुन देण्याचे काम काॅलेजच करते हे आम्हाला माहित होते. या अनुषंगाने प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला महाविद्यालयाची शिक्षण व परीक्षा पध्दती, राबविण्यात येणारे उपक्रम या सर्व बाबींची माहिती देण्यात आली होती. आणि सांगीतल्या प्रमाणेच आमच्याकडून तयारी करून घेतली. अनेक तंज्ञांचे मार्गदर्शनही मिळाले. या सर्व बाबींमुळे आम्ही मुलांखतींमध्ये यशस्वी होवु शकलो आणि चार वर्षांपूर्वी आम्ही व आमच्या आई-वडीलांनी डोळ्याात साठवलेले नोकऱ्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. या संधीचे आम्ही सोने करू नोकरीच्या ठिकाणी अद्ययावत ज्ञान घेवुन रायसोनीचे व पालकांचे नाव उज्वल करू, असे भावुक होवुन सांगीतले.

 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश