रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
जळगाव, ता. ६ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांच्या समाजासाठी केलेल्या संघर्ष जीवन चरित्रावर प्रकाश टाकला तसेच डॉ. बाबासाहेबांचे तत्वज्ञान व सध्याची परिस्थितीशी परस्पर सबंध व त्यांचे पुढे होणारे संभाव्य परिणाम यावरही त्यांनी व्यापक व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन विध्यार्थ्यांना केले. सदर कार्यक्रमाला एमबीए विभागप्रमुख प्रा. मकरंद वाठ, प्रा. रफिक शेख, प्रा. राज कांकरिया, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. गणेश पाटील, प्रा. तन्मय भाले, प्रा. गौरव जैन, प्रा. विनोद देशमुख, प्रा. भूषण राठी, प्रा. मोनाली शर्मा, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. वसिम शेख, प्रा. अविनाश पांचाळ आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment