रायसोनी महाविध्यालयाच्या प्रा. डॉ. दिपेन कुमार रजक यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

दोन वर्षात केली १३ पेटंटची नोंद ; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

जळगाव, ता. ३ ; दोन वर्षात तेरा पेटंट नोंदविण्याचा इंडिया बुक ऑफचा विक्रम शहरातील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील मॅकेनिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख व संशोधक प्रा. डॉ. दिपेन कुमार रजक यांनी नोंदविला आहे. सामान्यांपासून उद्योगांपर्यंत कमीत कमी वेळ व खर्चात बहुउपयोगी संशोधन उपलब्ध करून देणे, हा संशोधनाचा मुख्य गाभा आहे. आयआयटी येथे मटेरीअल अॅन्ड डिझाईन मध्ये पीएचडी झालेले व भारतातील विविध नामवंत संस्थामध्ये प्राध्यापक व संशोधक म्हणून सेवा बजावलेल्या डॉ. दिपेन कुमार रजक हे अमेरिका, सौदी अरेबिया, इराण, दुबई आदी देशांच्या विविध संस्थासोबत एकत्रित काम करीत आहे तसेच ते सध्या शहरातील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील मॅकेनिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख म्हणूनही काम पाहत आहेत. त्याच्या या यशाबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले आहे.  

 

ही आहेत १३ पेटंट

१)      पॉवर स्टोरेज सिस्टमसह थर्मॉस बाटलीमध्ये पाणी गरम करण्यासाठी बहु-ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे.

२)      झटपट इलेक्ट्रिक हीटिंग वॉटर नळ प्रणाली आणि संरचना

३)      सामग्रीची पद्धत आणि वितळण्यासाठी मल्टी-फंक्शनल इंडक्शन

४)      स्मार्ट तंत्रासह आधुनिक हंडी.

५)      चाचणी नमुने तयार करण्याची पद्धत आणि त्याकरिता मोल्डिंग डाय.

६)      ऊर्जा कार्यक्षम स्मार्ट प्रेशर (EESP) वेसल सिस्टम.

७)      स्मार्ट कंट्रोल प्रेशर वेसल

८)      स्मार्ट कमोड.

९)      हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग आणि मेटल फोमसह मॉड्यूलर हायब्रिड क्रॅश बॉक्स

१०)  इंडो-वेस्टर्न अॅडजस्टेबल स्मार्ट कमोड सिस्टीम आणि त्याच्या पद्धती

११)  नल टॅप डिझाइन (एफटीडी) आणि द्रव आणि वायूंसाठी फॅब्रिकेशन पद्धत

१२)  फायबर-रिइन्फोर्स्ड पॉलिमर (FRP) संमिश्र साहित्य आणि त्याच्या पद्धती.

१३)  प्रथमोपचार किट वेंडिंग मशीन (FKVM) प्रणाली आणि त्याच्या पद्धती.


Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश