आपल्या उद्योगाच्या प्रगतीसाठी तात्काळ नवतंत्रज्ञान आत्मसात करा : प्रा. समिश दलाल

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात “नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उद्योजकताया अंतर्गत ऑनलाईन राष्ट्रीय परिषद; ०० संशोधकस्कॉलर िध्यार्थी  उद्योजकानी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग

फोटो ओळ : रायसोनी महाविध्यालयातील ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्रमुख पाहूणे प्रा. समिश दलाल

जळगाव ता. १५ : आजचे शिक्षण आणि उद्योगांना लागणरी कौशल्ये यामध्ये मोठी तफावत आहे. यामुळे रोजगार उपलब्ध असतांनाही प्रत्यक्षात मिळत नाही आणि शिक्षण असूनही उमेदवार बेरोजगार राहतात. यासाठी आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन युवक-युवतींनी रोजगारक्षम व्हावे तसेच तंत्रज्ञानामुळे व कोरोनामुळे उद्योगात बदल झाले असे नाही तर ते कालचे उद्योग आजही त्याच स्थितीत आहे फक्त त्याच्या यशस्वी मार्गक्रमणाची पद्धत बदलेली आहे म्हणजेच आजच्या अपडेट तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे आणि आजच्या युवकांनी या बदलत्या प्रवाहासोबत जुडवून घ्यावे तसेच उद्योजकानी चांगल्या वेळेची वाट पाहत न बसता त्याच्यासाठी प्रत्येक वेळ ही काही सकारात्मकतेच्या सुरुवातीसाठी चांगली असते असे मत मुंबई येथील एस. पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटचे प्रा.समिश दलाल यांनी व्यक्त केले.

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालय व अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उद्योजकता”  या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जळगाव येथील विनले पॉलीमरचे संचालक श्री. प्रमोद संचेती, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विध्यापिठातील स्कूल ऑफ मॅनेजमेटचे संचालक प्रा. डॉ. अनिल डोंगरे  उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कीरायसोनी इस्टीट्युट सदैव दर्जात्मक शिक्षण देण्यास आग्रही असतेनाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उद्योजकता” या उपक्रमाचा विध्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल व मार्गदर्शकाचे सकारात्मक अनुभव त्याचा प्रॅक्टीकल अभ्यास याने विध्यार्थ्यांना एक नवी वाटचाल मिळेल तसेच ओद्योगिक क्रांती ४.० नंतर बदलते तंत्रज्ञान ही प्रत्येक उद्योगाची गरज बनली आहे. ग्राहकाभिमुख सोयी सुविधा आणि उत्पादन निर्माण करून विक्री करतांना तंत्रज्ञानाची जोड ही अद्वितीय परिणाम साधू शकते तसेच संशोधक व विध्यार्थ्यानी तंत्रज्ञानाचा वापर उद्योजकतेच्या वाढीसाठी कसा करावा या विषयी संशोधन आत्मसात करणे यावर त्यांनी भर दिला व स्टॅन्ड अप इंडिया व स्टार्ट अप इंडिया च्या उद्धेशपूर्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, प्रगतीशील मनुष्यबळ आणि उद्योजकतेची मानसिकता दिशा दर्शवणारी ठरू शकते असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अनिल डोंगरे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की मानवाने जरी तंत्रज्ञानात अतुलनीय क्रांती केली असली तरी आजही ७० टक्के जनसंख्या ही दारिद्र्य रेषेजवळ आहे. तंत्रज्ञानाचा विकास हा उद्योजकता आणि उत्पादन वाढीसाठी करीत असतांना समाजाभिमुखता जपणे महत्वाचे ठरते तसेच मनुष्याच्या उत्पत्तीपासून उद्योजकता हे मानवी सभ्येतेचा विभिन्न अंग राहीला आहे. तसेच जे तंत्रज्ञान व उद्योग समाजातील गरीब व श्रीमंत यातील अंतर कमी करू शकेल तेच खरे तंत्रज्ञान असल्याचे त्यांनी म्हटले. यानंतर विनली पॉलीमरचे संचालक प्रमोद संचेती यांनी तंत्रज्ञानात भारताने मोठी भरारी घेतली आहे. जगातील सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या जोडीला काम करावे लागते. त्यामुळे अशा मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माद्यमातून तंत्रज्ञान अभ्यासायला मिळते. तंत्रज्ञाचा अद्ययावत अभ्यास आपणास माहिती पाहिजे. तसेच आयुष्यात पुढे जायचे असेल तर आत्मविश्वास व संवाद कौशल्यनेतृत्व विकास, समन्वयता, वैचारिक सकारात्मकता, वेळेचे नियोजन अत्यंत महत्वाचे असते. त्यामुळे या गोष्टी विकसीत करणे गरजेचे आहे. तसेच विध्यार्थ्यानी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले   सदर ऑनलाईन कार्यशाळेचे समन्वयक विभागप्रमुख प्रा. मकरंद वाठ, प्रा. राजकुमार कांकरिया, प्रा. ज्योती जाखेटे हे होते तर आभार प्रा. राहुल त्रिवेदी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रीतम रायसोनी यांनी कौतुक केले 

 

४० संशोधन पेपर झाले प्रसिद्ध

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालय व अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उद्योजकता या कार्यक्रमात स्टार्ट अप इंडिया, ओद्योगिक क्रांती, तंत्रज्ञान, आजची ऑनलाईन शिक्षण व्यवस्था, ई लर्निग, आर्टिफ़िशिअल इंटेलीजन्स, मशीन लर्निग, डेटा अॅनालीटीक्स, उद्योजकता विकास व कौशल्य यासारख्या विविध विषयांवर संशोधकांनी पेपर प्रसिद्ध केले यात रिव्यूव्ह कमिटीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विध्यापिठातील कविता तुकाराम पाटील, आर. पी. भावसार, बी. व्ही. पवार, रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातील प्रा. राजकुमार कांकरिया, प्रा. डॉ. अनिल डोंगरे व अशोक बिजनेस स्कूल येथील प्रा. मनीषा भामरे, डॉ.विकास गोंजारे या संशोधकांचे पेपर प्रथम क्रमांकाने घोषित करण्यात आले.  

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश