रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात “स्पार्क इलेक्ट्रा फेस्ट-२०२१” चे आयोजन

 


जळगाव ता. १३ : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात विद्युतशास्त्र विभागाच्या वतीने स्पार्क इलेक्ट्रा फेस्ट- २०२१ चे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.. या स्पर्धेत महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदवला. फेस्टच्या उद्घाटन कार्यक्रमाला रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी महाविध्यालयाची शैक्षणिक व विविध उपक्रमाची माहिती दिली. तसेच इलेक्ट्रिकल डिझाइन इंजिनिअर दिपाली कासार व उर्जा स्वराजचे संचालक महेश खवरके या उपस्थित परीक्षक व मार्गदर्शकांचा त्यांनी सत्कार केला. यावेळी स्पार्क इलेक्ट्रा फेस्टमध्ये प्रश्नमंजुषा, लोगो डिझाईन, पोस्टर प्रेझेटेशन, प्रकल्प मुल्यांकन, सर्किट मिनिया यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच स्पार्क इलेक्ट्रा फेस्टमध्ये अकॅडमिक इंजिनिअरिंगचे डीन प्रणव चरखाविद्युतशास्त्र विभागप्रमुख बिपासा पात्रा, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. सोनल पाटील, प्रा. मकरंद वाठ, प्रा. दिपेन कुमार रजकप्रा. रफिक शेख,  प्रा. राज कांकरिया, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. गौरव जैन, प्रा भूषण राठी, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. गणेश पाटील, प्रा. तन्मय भाले, प्रा. कल्याणी नेवे आदि सहभागी झाली होते तसेच या कार्यक्रमासाठी रीसा कमिटी व प्रा. मनीष महाले यांनी सहकार्य केले. व कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रीतम रायसोनी यांनी कौतुक केले 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश