पुन्हा पुन्हा लाईट जाण्याच्या समस्येवर रायसोनीच्या विध्यार्थ्यानी शोधला उपाय
विध्यार्थ्यांच्या ईलेक्ट्रिसिटी डीस्ट्रीब्युशन कंट्रोल सिस्टीम प्रकल्पाचा शासनाच्या विद्युत विभागाला होणार फायदा ; रायसोनी महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक
जळगाव प्रतिनिधी, ता. १ : आजकाल नागरिकांना पुन्हा पुन्हा लाईट जाण्याच्या समस्येने मोठ्याप्रमाणात हैराण करून सोडले आहे यावर उपाय म्हणून शहरातील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविदयालयाच्या विद्युत विभागातील तुषार बोरसे, तेजस महाजन ,योगेश गिरासे ,मयुर पाटील या विध्यार्थ्यानी लाईट जाण्याच्या समस्येवर तात्काळ व मानवविरहित असे स्वयंचलित प्रकल्पाचे निर्माण केलेले असून समजा एखाद्या परिसरातील लाईट गेली तर दुसऱ्या कनेक्शनवरून त्या परिसराला स्मार्टली व तात्काळ विद्युत पोहोचविण्याचे काम हे स्वयंचलित प्रकल्प करणार आहे तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्युत उपकरणे वापरल्यामुळे त्या ठिकाणी होणारा विजेचा अभाव आपण थांबवू शकतो हे देखील या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सदर ईलेक्ट्रिसिटी डीस्ट्रीब्युशन कंट्रोल सिस्टीम हा प्रकल्प रायसोनी महाविद्यालयातील विद्युत विभागप्रमुख बिपासा बी. पात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यानी यशस्वीरित्या पूर्ण केलेला असून या प्रकल्पाच्या पुढील भविष्यासाठी रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment