एमबीए पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या किंवा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याच्या अनेक संधी : तुषार मुळे
रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाअंतर्गत “ एमबीए प्रथम वर्ष ” स्वागत समारंभाचे आयोजन जळगाव , ता. १ : एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश घेणे हे आपल्या करिअरच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे पाऊल आहे. एमबीए पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या किंवा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र याकरता हा अभ्यासक्रम योग्य प्रकारे पूर्ण करणे हे तितकेच आवश्यक आहे हे लक्षात ठेवायला हवे. असे आवाहन डेल कार्निगो सर्टिफाइड सॅाफ्टस्कील ट्रेनर तुषार मुळे यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना केले. जळगाव येथील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट च्या व्यवस्थापनशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश सोहळा अर्थात ‘ इंडक्शन- जुनून ’ या सोहळ्यात विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि , विद्यार्थ्यानी कोणत्याही बाबतीत संकोच न बाळगता पुढाकार घेऊन नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अमुक एखादी गोष्ट मला समजलेली ...