रायसोनी महाविद्यालयात फॅमिली मॅनेज बिजनेसवर मार्गदर्शन

बिजनेस मॅनेजमेंटच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती जळगाव, ता. २६ : व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये कार्यरत असलेली “एआयसीटी” या अग्रगण्य संस्थेद्वारे भारतातील विविध तांत्रिक व व्यवस्थापकीय शिक्षण संस्थामध्ये उद्योकता विकास तसेच स्टार्टअपवर मागर्दर्शन करण्याकरिता विविध प्रकारचे आन्ट्रप्रनर्शिप डेव्हलपमेट क्लबची स्थापना कराव्यात अशा मार्गदर्शक सूचना एआयसीटीने केल्या असून या अनुषंगाने शहरातील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात उद्योजकता विकास कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या डीन प्रा. ज्योती जाखेटे यांच्या संकल्पनेतून नुकताच “आन्ट्रप्रनर्शिप, बिजनेस आयडिया अॅन्ड बिजनेस मॉडेल कॅनव्हास” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होत. यावेळी डीन प्रा. ज्योती जाखेटे व प्रा. डॉ. मोनाली शर्मा यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, आपल्या देशाच्या आर्थिक वाढीत फॅमिली बिजनेस मॅनेजमेंटचा नव्वद टक्के ...