Posts

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने एकाच दिवशी नोंदविले १९४ कॉपीराईट व १८ पेटंट

Image
“ जागतिक बौद्धिक   संपदा दिनानिमित्त विद्यार्थी व   प्राध्यापकांची कामगिरी   ;  विविध स्तरातून कौतुकांचा वर्षाव जळगाव , ता. २७  : मानवी बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २६ एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिन सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने जळगाव शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “ जागतिक बौद्धिक   संपदा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एकूण १९४ कॉपीराईट व १८ पेटंट महाविद्यालयाच्या विध्यार्थी व प्राध्यापकांनी दाखल केले. गेल्या तीन वर्षापासून असे विक्रम करणारे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवत असलेल्या जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने २०२२ ला १५४ – २०२३ ला १०८ अन यावर्षी जागतिक बौद्धिक संपदा दिनाच्या औचित्याने १९४ कॉपीराईट व १८ पेटंट नोंदवून मोठी कामगिरी केली आहे. इस्टीट्युटच्या इंडस्ट्री प्रॅक्टीसेस , अॅकडमिक , शैक्षणिक साहित्य तसेच इंडस्ट्रीमध्ये कुठकुठल्या बेस्ट प्रॅक्टीसेस आहेत यासह स्टुडं...

यशस्वी भविष्यासाठी नॉलेज, अँटीट्युड व स्कील आत्मसात करा : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

Image
जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील अभियांत्रिकी व मॅनेजमेंट शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न जळगाव , ता. २५ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील अभियांत्रिकी व मॅनेजमेंट शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच महाविध्यालयाच्या प्रशस्त अश्या सभागृहात पार पडला. यावेळी विध्यार्थ्यांसाठी विविध सांस्कुतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा देण्यात आल्या. या सामूहीक कार्यक्रमाचे अध्यक्ष जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे होते. तर अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत , एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील , मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील , कॉम्प्यूटर अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील , स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते.  सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि , आपल्या यशस्वी भविष्यासाठी प्रत्येक युवकाने ...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा शनिवारी “पदवीदान समारंभ”

Image
विविध विद्याशाखेतील ७१२ स्नातकांना करण्यात येणार पदवी प्रदान ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांची माहिती जळगाव , ता. १६ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाचा दुसरा २०२२-२३ या वर्षाचा “ पदवीदान समारंभ ” दिनांक २० एप्रिल २०२४ , शनिवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या प्रशस्त अश्या ऑडीटोरीयममध्ये सकाळी ११ च्या सुमारास हा सोहळा पार पडणार असून या सोहळ्याला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे हे अध्यक्षीय भाषण करणार आहेत तर  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट , जळगावचे अॅडव्हायझरी बोर्ड व आयक्यूएसीचे मेंबर सिए दर्शन जैन हे उपस्थित स्तानकांना उपदेश देणार आहे. तसेच रायसोनी ग्रुप ऑफ इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी , संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , बोर्ड ऑफ गव्हर्नन्स मेंबर प्रमोद संचेती , अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व परीक्षा नियंत्रक गौरव तिवारी यासह बोर्ड ऑफ स्टडी व अकॅडमिक कोंसीलचे मेंबर हे प्रमुख पाहुणे म्हणून या समारंभास उपस्थित राहणार असल्याची म...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा भव्य रोजगार मेळावा संपन्न !

Image
आंतरराष्ट्रीय कंपनीत एमबीए व एमसीएच्या ११० विद्यार्थ्यांच्या कॅम्पस मुलाखती ; महाविद्यालयातील ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट विभागाचा उपक्रम जळगाव , ता. १५ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे “ केपी इन्फोटेक व डीजीविंटेज ” या आयटी कंपनीमार्फत जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “ भव्य रोजगार मेळाव्या ” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व निवडकर्ते म्हणून “ डीजीविंटेज ” व “ केपी इन्फोटेक ” या कंपनीचे संचालक श्री. राजेश काळे तसेच जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते. यावेळी १९० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली तर ११० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले की , जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या संकल्पनेतून रोजगार , समपुदेशन व मार्गदर्शन केंद्राची महाविद्यालयात स्थापना करण्यात आली आहे. महाविद्य...

शिक्षणात भारतीय ज्ञानपरंपरेचा समावेश म्हणजे विकसित देशाच्या दिशेने वाटचाल : श्री. भुजंग बोबडे

Image
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रचारार्थ जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “ प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरे ” वर मार्गदर्शन जळगाव , ता. ८ : नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार समृद्ध प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे ज्ञान विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने ‘ इंडियन नॉलेज सिस्टीम ’ याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.. शाळांपासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंतच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये भारतीय ज्ञानाविषयीची माहिती अंतर्भूत केली जाणार असून याच अनुषंगाने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात इंटर्नल क्वालिटी असुएर्नेस सेल इस्टीट्युशनल आयकेएस सेंटर व भारतीय शिक्षण मंडळ जळगाव जिल्हा देवगिरी प्रांताच्या माध्यमातून “ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व  भारतीय ज्ञानपरंपरा ” या विषयांवर नागपूर येथील रिसर्च फॉर रिसर्जेन्स फाऊंडेशनच्या नॉलेज रिसोर्स सेंटरचे संचालक व भारतीय शिक्षण मंडळाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्री. भुजंग बोबडे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “जागतिक आरोग्य दिन” उत्साहात साजरा

Image
पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह व हेल्थकेअर रिसर्चर महेंद्र पाटील यांचे विशेष व्याख्यान ; विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती   जळगाव , ता. ६ : दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेने १९५० मध्ये केली होती आणि त्याचा मुख्य उद्देश जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता हा असून या औचित्याने ता. ६ , शनिवार रोजी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे “ इनोव्हेशन , आयपीआर अँड हेल्थ केअर ” तसेच “ स्ट्रेस फ्री लाईफ ” या विषयांवर पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह व हेल्थकेअर रिसर्चर महेंद्र पाटील यांचे विशेष व्याख्यान आयोजित करत जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि , आरोग्याचा सर्वोच्च बिंदू आहे आनंद , त्याचे रहस्य भ...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये चिमुकल्यांचे रंगले “ग्रॅज्युएशन सेरेमनी”

Image
दीक्षांत समारंभ प्रमाणपत्र देवून गौरव ; मोठ्या संख्येने विध्यार्थ्यांचा जल्लोष जळगाव, ता. ५ ; जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा ‎ येथील ज ी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये प्री-स्कूल व प्री-प्रायमरीच्या लहान विध्यार्थ्यासाठी पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात विद्यार्थ्यांना गाऊन व कॅप परिधान करून पदव्या स्वरूपात प्रमाणपत्र देऊन विधीवत गौरवण्यात आले. पूर्व प्राथमिक वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करून प्राथमिक वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता ग्रॅज्युएशन सेरेमनी आयोजित करण्यात आली होती. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यासह विविध मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये २०२३-२४चा हा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व प्राथमिक मधील विद्यार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित होते. या पदवीदान समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन व माता सरस्वती देवीचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी केले. यावेळी त्यांनी नमूद केले कि, कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकर...