जी. एच. रायसोनीत युवा महोत्सव “कश्ती” ची धूम
वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहात समारोप ; विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग जळगाव , ता. ९ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाचा “ कश्ती ” हा वार्षिक दोन दिवसीय स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. ' भारतातील संस्कृती ' या विषयावरील कार्यक्रम सादर झाले तसेच गुणीजन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विध्यापिठातील स्कूल ऑफ मॅनेजमेटचे संचालक प्रा. डॉ. अनिल डोंगरे , नवकार इन्वेस्टमेंटचे संचालक सौरभ जैन , रायसोनी इस्टीट्यूटचे ऍडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा , एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी व एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी रायसोनी इस्टीट्यूट गेली अनेक वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करीत असून या इस्टीट्यूट मधून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर आहेत. सध्या महाविध्यालयात श...